मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला राजपूत समाजाचा पाठिंबा.

 मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला राजपूत समाजाचा पाठिंबा.



औसा प्रतिनिधी मुखतार मणियार 


औसा -मराठा समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरू आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून औसा येथे गरजवंत मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला आज औसा तालुक्यातील राजपूत समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक धर्मेंद्रसिंह  बिसेनी सर यांनी सांगितले की, समस्त राजपूत समाज मराठा समाजाच्या सोबत आहे ,शासनाने मराठा समाजाच्या  प्रतिक्षेचा अंत पाहू नये  व तत्काळ आरक्षण द्यावे असे सांगितले. 

यावेळी जयराज ठाकूर, जयपालसिंह ठाकूर यांनी आपले विचार व्यक्त करत मराठा बांधवाना पाठिंबा दिला. 

समस्त राजपूत समाज मराठा समाजासोबत असून वेळ प्रसंगी आम्ही मराठा समाजसोबत रस्त्यावर उतरू असे आश्वासन राजपूत समाजाच्या पाठिंबा निवेदनात म्हंटले आहे.

यावेळी औसा शहर राजपूत समाज अध्यक्ष संतोषसिंह दीक्षित, सचिव बालाजी तोंवर, शंकरसिंह चौहान, जीवनसिंह ठाकूर, मुकेश तोंवर, जगदीशसिंह चौहान,  अजयसिंह परदेशी यांच्यासह अनेक राजपूत समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या