औसा येथे चालु असलेल्या मराठा आरक्षण मागणी आंदोलनास एम. आय. एम पक्षाचा जाहीर पाठिंबा..
औसा प्रतिनिधी मुखतार मणियार
ए आय एम आय एम औसा
आज दी. ३0 / १0 / २0२३ / रोजी औसा तहसील कार्यालय समोर व औसा तालुक्यात ईतर गावात चालू असलेल्या मराठा आरक्षण मागणी आंदोलनास जाहीर पाठींबा बाबत आज मा.तहसीलदार साहेब औसा यांच्या वतीने मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले
या प्रमुख मागणीमध्ये दिं. २६ / आक्टोंबर २0२३ पासुन चालू असलेल्या औसा शहरातील व औसा तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पांठीबा देण्यासाठी औसा तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी आंदोलन चालु केलेले आहे व औसा तालुक्यातील विविध गावात मराठा आरक्षण मागणीसाठी धरणे आंदोलन चालु आहे या सर्व उपोषण व आंदोलनास तसेच साखळी उपोषणास व त्यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या रास्त मागणीस ए आय एम आय एम औसा तालुक्याच्या वतीने जाहीर पाठींबा देताना अँड. गफुरुल्लाह हाशमी माजी औसा तालुकाध्यक्ष, सय्यद कलिम शहरअध्यक्ष औसा , सय्यद जमीरोद्दीन शहर सचिव औसा.कुरेशी ऊजेफ शहरउपाध्यक्ष,देशमुख शकील कोषाध्यक्ष, पठाण आमेर,काझी इमरान,शेख अली ईत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या