नजर हटी दुर्घटना घटी..
भादा ..शिवली रस्त्याचे काम आडल्याने शेतकऱ्यांचे मोठी नुकसान...रस्त्याचा जीवितास धोका.
..
सर्वच स्तरावरील प्रयत्न अयशस्वी...
औसा प्रतिनिधी
औसा: भादा ते शिवली या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून हा रस्ता जवळपास पूर्ण होत आलेला आहे परंतु भादा शिवारांमध्येच हा रस्ता अनेक ठिकाणी अडविल्याचे प्रदर्शन दररोज गावामध्ये घडते.. कारण सध्या अत्यंत संवेदनशील असा असणारा रस्त्याचा भाग म्हणजे भादा ते शिवली रस्त्यावरील भादा गावापासून जवळपास दोन किमी अंतरावरील पूल.या ठिकाणी रस्ता कामामध्ये खोदकाम करून ठेवण्यात आलेले आहे त्या खोदकामाच्या बाजूने जात असताना केवळ अडीच ते तीन फुटाचा साफ रस्ता असल्याने आणि त्याच्याच बाजूला आठ ते दहा फुटाचा खड्डा असल्याने नजर हट्टी,दुर्घटना घटी..!असे असून थोडे बोलल्यास आईला गेल्यानंतर त्या ठिकाणी मुरूम खडी दगड गोटे असून त्या ठिकाणीही असाच रस्ता अरुंद आहे कसे पाहिले असतात तेथेही दगडावरून गाडी निसटली तर सुरू असलेल्या बांधकामाची काँक्रीटची भिंत आणि त्यामध्ये वापरण्यात आलेले स्टील यावरच नागरिक शेतकरी किंवा प्रवासी पडल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याच्या जीविताचे काही बरे वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही? तरीही अशा संवेदलनशील भागातून दररोज शेकडो नागरिक/शेतकरी तारेवरची कसरत करत हा रस्ता क्रॉस करतात परंतु असा रस्ता दैनंदिन वापरत असताना अनेक अडचणींचा सामना करताना या भागातील किंवा गावामध्ये कोणी संवेदनशील नागरिक आहे काय?अशीही भावना या रस्त्यावरून जात असताना प्रत्येक नागरिकांच्या मनात तो धोकादायक भाग पाहून आल्याशिवाय राहत नाही किंवा हा रस्ता पाहिला असता अंधेर नगरी चौपट राज!? याचाही प्रत्यय आल्याचे अनेक नागरिकाकडून उघडपणे बोलले जाते. परंतु सदरील समस्या निवारणासाठी कोणतेही गावांमधील व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता,राजकीय पदाधिकारी किंवा तालुका,जिल्हा स्तरावरीलही पदाधिकारी यांच्याकडे वारंवार जावून समस्यांचा पाढा वाचला त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा समक्ष भेट घेऊन ही अनेक शेतकऱ्यांनी चर्चा केली असता याकडे त्यांचे पोकळ आश्वासन आणि दुर्लक्षच असल्याचे दिसून आले आहे..... तसेच त्या दुर्गम आणि धोकादायक ठिकाणाहून जाणारे शेतकरी आणि शिवली,वरवडा गावास जाणाऱ्या काही वाटसरू नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झालेला आहे. तर या रस्त्यावरून फक्त मोटार सायकल जाते मोठे वाहन जात नाही ही बाब सदरील स्थानिक पुढारी, दुसरे पदाधिकारी येईपर्यंत आपणच सरपंच असणारे,आजी,माजी सरपंच,कामाचे गुत्तेदार,अभियंता,प्रशासन आणि संबंधित शेतकरी यांनाही माहिती आहे. परंतु नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे दैनंदिन शेतकऱ्यांना शेती कामे आणि जनावरांसाठी चारा पाणी,दूध काढण्यासाठी शेतीकडे जायला रस्ताच नाही आणि हा रस्ता जवळपास एक वर्ष होत आहे तो बंदच आहे परंतु या भागामध्ये कोणताही स्थानिक पुढारी,पदाधिकारी, स्थानिक शेतकरी या रस्त्याने जाणारे वरवडा,शिवली गावचे गावकरी किंवा या रस्त्याचा अत्यंत संवेदनशील काळामध्ये अत्यंत उपयोगी उपयोग होणाऱ्या भादा पोलीस ठाणेचे संबंधित अधिकारी यांनाही या रस्त्याची भविष्यातील महत्वाची उपयोगिता लक्षात येत नाही यामुळेच हा रस्ता काम अडलेले आहे...
याबाबत विशेष ग्राम सभा घेऊन रस्ताकाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला पाहिजे...अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.

0 टिप्पण्या