सुलेमान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथे सामाजिक उपक्रमांची मेजवानी; नेत्रतपासणी, चष्मा वाटप आणि 'माय औसा' (My Ausa) अ‍ॅपचे लोकार्पण..

 सुलेमान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथे सामाजिक उपक्रमांची मेजवानी; नेत्रतपासणी, चष्मा वाटप आणि 

'माय औसा' (My Ausa) अ‍ॅपचे लोकार्पण..







 

औसा (प्रतिनिधी):

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष  सुलेमान  अफसर शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून औसा शहरात आरोग्य व सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडले. प्रभाग क्र. १० मधील कटघर गल्ली येथील शादीखाना येथे भव्य मोफत नेत्रतपासणी, चष्मा भेट शिबिर,व तसेच गोरगरीब गरजू महिलांना साडी वाटप तसेच औसा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन औसा नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून औसा नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. अतीकाबाजी खादर सय्यद उपस्थित होत्या. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून शेकडो नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली तसेच गरजू लाभार्थ्यांना मोफत चष्मे व  वाटप करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप

वाढदिवसाचे औचित्य साधून औसा नगर परिषदेत कार्यरत असणारे सफाई मजूर, पाणीपुरवठा व लाईट विभागातील कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात सुरक्षितपणे काम करता यावे, यासाठी रेनकोट, छत्री आणि सेफ्टी जॅकेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीची एक नवी ओळख निर्माण केली आहे.


'माय औसा' अ‍ॅपचे लाईव्ह लोकार्पण


नागरिकांच्या सुविधेसाठी औसा नगरपरिषदेच्या वतीने 'माय औसा' (My Ausa) या मोबाईल अ‍ॅपचे लाईव्ह लोकार्पण सोहळा प्रभारी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या अ‍ॅपच्या माध्यमातून औसा शहरातील नागरिकांना रस्ते, नाल्या, स्वच्छता, स्ट्रीट लाईट यांसह इतर नागरी समस्यांबाबत थेट तक्रार नोंदविता येणार आहे. विशेष म्हणजे नोंदवलेल्या तक्रारीच्या निवारणाची माहिती आणि स्टेटस ही नागरिकांना अ‍ॅपवर पाहता येणार आहे.


या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन  डॉ अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच औसा नगर परिषदेचे नगरसेवक रफिक बाबा मुंगले  तर आरोग्य व स्वच्छता सभापती मेहराज शेख यांच्या पुढाकारातून हे उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  जावेद शेख, मेहराज शेख, गोविंद जाधव, खुंदमीर मुल्ला, मौलाना कलीमुल्ला, अविनाश टिके, किर्तीताई कांबळे, वैशाली नारायणकर,कृष्णा सावळकर, आनंद बनसोडे, सचिन कसबे, वकील इनामदार, खादरभाई सय्यद, रफिक मुंगले, बासीद शेख, फहाद अरब, हमीद सय्यद, रुपेश दुधनकर, मुकेश तोवर, अमर रेड्डी, अविनाश सूर्यवंशी,अखलाख पटेल आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून हे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगत सुलेमान राजे शेख यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या