शिव कीर्तनातून हिरेमठ संस्थानची धर्म जागृती..
औसा/प्रतिनिधी - औसा येथील हिरेमठ संस्थांनच्या वार्षिक महोत्सवातून इष्टलिंग महापूजा, शिव-दीक्षा सोहळा, शिवपाठ, शिव कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पंच पीठाच्या श्रीमद जगद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये धर्मसभेतील आशीर्वचनातून वीरशैव लिंगायत धर्माची दिलेली शिकवण अत्यंत मोलाची असून संस्थांनच्या ८६ व्या वार्षिक महोत्सवा निमित्त दिनांक १ ऑगस्ट पासून शिवकिर्तन महोत्सवास प्रारंभ झाला आहे.
शिवभक्त परायण वीरभद्र स्वामी दावतपूर, उमाकांत मिटकरी चुंबळीकर, महाराज आणि लक्ष्मण विभुते महाराज माळकोंडजी यांच्या शिवकिर्तनास भाविक भक्तांची अलोट गर्दी होत असून शिव कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून धर्म जागृतीच्या कार्यास गती आली आहे. 'मार्ग हा मुक्तीचा' या ग्रंथाचे नित्य विवेचन सुरू आहे. गुरु पौर्णिमेपासून हजारो भाविकांना महाप्रसादा मधून अन्नदान करण्यात येत आहे.
अन्नदाते सर्वश्री नंदकुमार लद्दे, सोमनाथ पेंडपाले, अनंद कोरके, सोमनाथ लोखंडे, शिवाजी कुंभार, आनंदवाडी येथील समस्त ग्रामस्थ आणि श्रीमती पार्वतीबाई गुरुपदप्पा कुरले यांच्या तर्फे अन्नदानाची सेवा दिली जात आहे. संस्थांनचे मार्गदर्शक डॉ. शांतवीर शिवाचार्य महाराज आणि विद्यमान पिठाधीपती बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली संपन्न करण्यासाठी वीरशैव समाज आणि वीरशैव युवक संघटना औसा यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.


0 टिप्पण्या