*चालत्या कंटेनरमध्येच ड्रायव्हरचा हृदयविकाराने मृत्यू*
*कंटेनर 12 तास महामार्गावरच उभा; पंढरपूरच्या ड्रायव्हरचा दुर्दैवी अंत*
औसा: बुधोडा गावा नजीक तामिळनाडूच्या तिरुनलवेली येथून नांदेडकडे जाणारा कंटेनर क्रमांक *NL 01 AJ 6928* चा चालक कामावरील ताणामुळे आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने चालत्या गाडीतच मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
*काय घडलं?*
सदर कंटेनरमध्ये चालक एकटाच होता. काल दुपारी 11:30 ते 12:00 वाजल्यापासून हा कंटेनर एकाच ठिकाणी थांबून होता. बराच वेळ गाडी हलत नसल्याने स्थानिक नागरिकांना संशय आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता ड्रायव्हर सीटवरच निपचित पडलेला आढळला.
मृत चालकाचे नाव *पोपट उत्तम काटकर (वय 45), रा. चिलाईवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर* असे आहे.
पोपट काटकर हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरापासून लांब कंटेनर चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
*एका प्रामाणिक कष्टकऱ्याचा वाटेवरच झालेला हा मृत्यू सर्वांना हेलावून टाकणारा आहे.*

0 टिप्पण्या