लातूरमध्ये महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संघटनेची जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न..





 लातूरमध्ये महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संघटनेची जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न..




नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व सभासद नोंदणी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


लातूर, दि. 16 ऑगस्ट 2026 : महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया, मुंबईच्या लातूर जिल्हा संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने जिल्हा कार्यकारिणी बैठक, नवीन पदाधिकारी नियुक्ती तसेच सभासद नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 16) लातूर येथील हॉटेल  सह्याद्री येथे करण्यात आले.


सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत झालेल्या या बैठकीस संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देसाई, पुणे जिल्हा सचिव  सागर माने, महिला उपाध्यक्ष  अश्विनी वायसे तसेच स्वीय सहाय्यक स्नेहा शेडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.


बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संघटनेच्या लातूर जिल्ह्यातील आगामी संघटनात्मक वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात संघटनेचा विस्तार करण्यासोबतच डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना संघटित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबतही प्रदेश उपाध्यक्ष  समीर देसाई यांनी यावेळी मार्गदर्शन केले.


यावेळी संघटनेच्या विविध पदांवर  मान्यवरांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या  व आयडी कार्ड वितरण करण्यात आले. तसेच इच्छुक पत्रकार व डिजिटल मीडिया प्रतिनिधींची सभासद नोंदणी करण्यात आली. संघटनेची भूमिका, कार्यपद्धती आणि आगामी उपक्रम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.


लातूर जिल्ह्यात डिजिटल मीडिया क्षेत्राला अधिक संघटित व सक्षम करण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लातूर जिल्हाध्यक्ष मनीष हजारे, उपाध्यक्ष आनंत दंडके तसेच औसा तालुकाध्यक्ष शिवाजी जनार्धन मिसाळ यांनी पुढाकार घेतला.


महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया, मुंबईच्या लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य तसेच डिजिटल मीडिया क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित राहून संघटनेच्या पुढील वाटचालीस सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमात दिपमाला  जयराम तुपकर, सय्यद इस्माईल रसुल,अजय शाम बनसोडे, मुख्तार मणियार, कांबळे श्रीकांत, आफताब शेख,सय्यद परवेज, शेख इम्रान युनुस,यासीन रफीक शेख, श्रीकांत चलवाड, बाळकृष्ण प्रकाश कदम,अमोल मुंडे, प्रदीप गोरख पाटील, बालाजी  साहेबराव जगदाळे,सोनराव विठ्ठल गायकवाड ,रवी राजेंद्र कांबळे, शेख इस्माईल, संजय उदोर, कांबळे विशाल,सारगे पवन  रवींद्र, सुनील धोंडीराम शिंदे, राघवेंद्र देवडगा, मारुती धोंडीराम माने,

रामप्रसाद भगवानदास काबरा, परमेश्वर वाघमारे, दत्तात्रय जी परळकर आदीची उपस्थिती होती.हा कार्यक्रम चे सूत्रसंचालन मनीष हजारे यांनी केले तर आभार यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या