दिव्यांगाच्या 5% निधीचे तातडीने वाटप करण्यात यावे.औसा मुख्याधिकारी यांना निवेदन.
औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार
महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघ औसा यांच्या वतीने पाच टक्के दिव्यांग निधी वाटपाचा तातडीने निर्णय घेण्याबाबत औसा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात असे म्हटले आहे की नगरपालिकेत पाच टक्के दिव्यांग निधी बंधनकारक आहे परंतु चालू वर्षांमध्ये कोणताही दिव्यांग निधी देण्यात आलेला नाही तरी आम्हा दिव्यांगाच्या वतीने खालील प्रमाणे मागण्याचा निवेदन सादर करण्यात येत आहे 1}दिव्यांगाना त्वरित 5% निधी वाटप करण्यात यावे 2} दिव्यांना 50 टक्के घरपट्टी व नळपट्टीमध्ये सवलत देण्यात यावी व व्याजदंड माफ करण्यात यावा 3} दिव्यांगाला घरकुल 2.5 लाखावरून पाच लाखावर देण्यात यावं 4} दिव्यांग कक्षामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर व दिव्यांगाच्या संदर्भातील माहिती देण्यात यावी व पिण्याचे पाण्याची व बसण्याची व्यवस्था करण्यात यावी5} दिव्यांगांसाठी कॉलमच्या घराची अट रद्द करण्यात यावी दिव्यांग कायद्यासंदर्भात बोर्ड लावण्यात यावा तरी वरील सर्व मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात ही विनंती महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संघाचे औसा शहराध्यक्ष श्री अशोक देशमाने व तालुका अध्यक्ष हरिभाऊ कुलकर्णी तसेच त्यांचे अपंग बांधव यावेळेस निवेदन देताना मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या