ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलला सुलेमान शेख यांची सदिच्छा भेट


 ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलला सुलेमान शेख यांची सदिच्छा भेट


औसा : लातूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा युवा नेतृत्व सुलेमान अफसर शेख यांनी आज ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल,औसा येथे सदिच्छा भेट दिली.यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका अंजुमनेहा इकबाल शेख आणि सचिव ॲड.इकबाल रसूलसाब शेख यांनी सुलेमान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या ‘वारशाचे भान,नेतृत्वाची जान-सुलेमान शेख’ या विशेष लेखाची आकर्षक फ्रेम भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

     या लेखामध्ये सुलेमान शेख यांच्या युवा नेतृत्वाची वाटचाल,संघटन कौशल्य,सामाजिक बांधिलकी,शैक्षणिक क्षेत्रातील योगदान तसेच त्यांना लाभलेले आजोबा पै.एन.बी. शेख साहेब यांचे आशीर्वाद आणि वडील प्र.नगराध्यक्ष डॉ.अफसर बाबा शेख यांचे संस्कार यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

     सुलेमान शेख हे युवकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून,शिक्षण,समाजकारण आणि युवकांच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेत आहेत.कायद्याचे शिक्षण घेत असताना विद्यार्थी नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत त्यांनी समाजाशी आपली घट्ट नाळ निर्माण केली आहे.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचा उल्लेखही या विशेष लेखात करण्यात आला आहे.

     यावेळी सय्यद हकीम सर, पठाण समीर सर,शेख सय्यद, उमर शेख यांच्यासह शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या