औशात हिरेमठ संस्थान पुरस्कारांचे थाटात वितरण
समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, हिरेमठ संस्थानच्या वतीने यंदापासून प्रथमच राज्यस्तरीय ‘हिरेमठ संस्थान पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रीक्षेत्र उज्जैन पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री एकशे आठ सिद्धलिंग राज देशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात आणि डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. संस्थानचे पीठाधिपती बाल तपस्वी निरंजन महाराज यांच्या शुभहस्ते औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार तसेच उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह विविध क्षेत्रांतील गुणवंत मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वीरशैव समाज व वीरशैव युवक संघटना, औसा यांनी विशेष परिश्रम घेतले. अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी, सचिन आप्पा उटगे, नागेश आप्पा इळेकर, सचिव अमर उपासे यांच्यासह सकल वीरशैव समाजबांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे औसा शहरासह परिसरातून विशेष कौतुक होत आहे.






0 टिप्पण्या