डॉ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना १०६
व्या जयंतीनिमित्त जयनगर येथे विनम्र अभिवादन!
औसा (प्रतिनिधी):
औसा तालुक्यातील जयनगर येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी भीम आर्मी महाराष्ट्र संघटक विनोद कोल्हे, आरपीआय तालुकाध्यक्ष (औसा) सिद्धार्थ कांबळे, भीम आर्मी जिल्हा संघटक समाधान कांबळे, तसेच नागनाथ. कांबळे (नाना)भीम आर्मी औसा तालुकाध्यक्ष सुनील जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेंच औसा पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार अशोक राठोड साहेब आणि मुल्ला साहेब या कार्यक्रमास जयनगर व परिसरातील नागरिक, महिला, युवक तसेच बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी अत्यंत आदरपूर्वक आणि उत्साही वातावरणात लोकशाहीरांच्या विचारांचा जागर करत जयंती उत्सव साजरा केला.

0 टिप्पण्या