हिरेमठ संस्थान मध्ये गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी, उद्यापासून कीर्तन महोत्सव...

 हिरेमठ संस्थान मध्ये गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी, उद्यापासून कीर्तन महोत्सव...




औसा प्रतिनिधी : - औसा येथील हिरेमठ संस्थान मधील 86 व्या वार्षिक महोत्सवाचा शुभारंभ दि. 29 जुलै रोजी उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करून करण्यात आला, संस्थांचे मार्गदर्शक डॉ शांतवीर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिठाधिपती तथा बाल तपस्वी श्री निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली दि. 29 जुलै रोजी रात्री 09 : 00 वाजता शिवप दीपक पांडुरंग कोरे महाराज यांचे शिव किर्तन झाले. गुरुपाद्य पूजा कार्यक्रमास हजारो महिला पुरुष व युवक शिष्यगणांनी उपस्थिती दर्शविली होती. शनिवार (दि.01ऑगस्ट) पासून भव्य कीर्तन महोत्सवास प्रारंभ होत आहे. अखंड शिवनाम सप्ताह निमित्त शहरातील विविध महिला भजनी मंडळाचे भजन तसेच सप्ताह कालावधीमध्ये रात्री 07 ते 08 : 00 या वेळेत शिवभक्त सर्वश्री वेदमूर्ती वीरभद्र स्वामी दावतपूर, उमाकांत मिटकरी चुंबळीकर, कुमार स्वामी लोहारेकर, लक्ष्मण विभुते माळकोंडजी, वेळापुरे लिंबाळवाडी, निळकंठ विभुते माळकोट (जी), धनराज बुलबुले सामनगाव यांचे भव्य शिवकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तरी लिंगैकय गुरु निरंजन शिवाचार्य महास्वामीजी यांनी सुरू केलेली वीरशैव धर्म जागृतीची परंपरा अखंड चालू ठेवण्यासाठी भाविक भक्तांनी दर्शन कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सुभाषप्पा मुक्ता अध्यक्ष, वीरशैव लिंगायत समाज औसा, विजयकुमार मिटकरी, नागेशप्पा इळेकर, सचिनप्पा उटगे, वैजनाथ सिंदुरे उपाध्यक्ष, वीरशैव समाज औसा आणि वीरशैव  युवा संघटना औसा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या