राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, लातूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, लातूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी



लातूर : श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, लातूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानाची देवता माता सरस्वती तसेच गुरु परंपरेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी प्रभारी प्राचार्य प्रा. मुंडे एम जी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. गुरु हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर राखत शिस्त, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित विभाग प्रमुख प्राध्यापक गवळी बी आर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुंच्या मार्गदर्शनाचे अनन्यसाधारण महत्त्व बोधकथेच्या माध्यमातून पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात यश अर्जुने , सुचिता उबाळे, नम्रता कांबळे, अनुष्का बरुरे,हेमनार धनश्री, ओमकार लोंढे,शंकर कारामुंगे यांनी प्रेरणादायी मनोगते सादर केली.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक बिरादार जान्हवी व आभारप्रदर्शन यश अर्जुने यांनी यशस्वीरीत्या पार पडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या