लातूर फार्मसी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 लातूर फार्मसी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 




लातूर:'गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड दीप, संस्कारांची  अमूल्य शिदोरी आणि यशस्वी जीवनाचा खरा मार्गदर्शक म्हणजे गुरु'. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, संचालक नंदकिशोर बावगे, संचालिका डॉ. माधुरी बावगेप्रा शुभम वैरागकर,प्रा. माधुरी पोळकर यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकाला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कु. रोहिणी काळे या विद्यार्थ्यांनीने शिक्षका बद्दलचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात उपस्थित प्रा. भागवत सोमवंशी,प्रा. मनकराना कराळे, प्रा. सुप्रिया जाधव ,प्रा भाग्यश्री धोत्रे आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष हाके यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या