महाराणा प्रताप नगर मधील विहिरीचा गाळ उपसा करण्याची मागणी

 महाराणा प्रताप नगर मधील विहिरीचा गाळ उपसा करण्याची मागणी


 औसा प्रतिनिधी 

औसा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील महाराणा प्रताप नगर मधील नाल्याजवळील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून विहिरीमध्ये पालापाचोळा पडल्यामुळे सदर विहिरीतील पाणी घाण झाले आहे या परिसरातील नागरिक विहिरीतील पाण्याचा मोठा आधार असून यावर्षी पावसाची कमतरता असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे सार्वजनिक बोरवेल चे पाणी कमी झाल्यामुळे या विहिरीतील गाळाचा उपसा केल्यास नागरिकांना पाण्याची व्यवस्था होणार आहे तरी महाराणा प्रताप नगर मधील विहिरीच्या गाळाचा उपसा करून नागरिकांची व्यवस्था करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकातून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या