जि.प. प्रा. शाळा बुधोडा येथे प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

 जि.प. प्रा. शाळा बुधोडा येथे प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत




पुस्तके, गणवेश, गोड खाऊ वाटप; डॉ. आंबेडकर समितीकडून वह्या, पेन व पाट्यांचे वितरण


बुधोडा, दि. १५ जून : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बुधोडा येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच प्रवेश दिंडी, नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तकांचे वाटप, गणवेश वितरण तसेच गोड खाऊ वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सौ. शितल चिलमे, पंचायत समिती उपसभापती अमोल पाटील, राम बिराजदार, विस्तार अधिकारी शेख, सुरेखाताई सातपुते, अमरदीप कांबळे, निवृत्तीनाना अलगुले, डॉ. सुधीर मस्के, अरुण कांबळे, तुकाराम देवकते, बालाजी कांबळे, विजयकुमार कांबळे, मनीषा कांबळे, मुख्याध्यापक बिरादार तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.


कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीतर्फे विद्यार्थ्यांना १४ डझन वह्या, तितकेच पेन तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी पाट्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय येत्या आठवड्यात प्रत्येक विद्यार्थ्याला दप्तर देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करणाऱ्या मान्यवरांचे तसेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे शाळा प्रशासनाने आभार मानले. प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंदाचा उत्सव पाहायला मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या