औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्या; काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी

 औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्या; काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी





कर्जमाफी, मोफत बियाणे-खते आणि इंधन दरवाढ मागे घेण्याचीही मागणी..


औसा प्रतिनिधी 


औसा, दि. 12 जून :

औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मंजूर करावा, कर्जमाफी द्यावी तसेच शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.या 


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन 2025 मधील खरीप व रब्बी हंगामासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नियमानुसार पीकविमा भरला होता. मात्र भादा महसूल मंडळ वगळता इतर मंडळांतील शेतकऱ्यांना अद्याप विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे उर्वरित सर्व महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली.व  तसेच 


गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच सन 2019 पूर्वीचे थकीत कृषी कर्जही तात्काळ माफ करावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.


याशिवाय राज्य शासनाने कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द कराव्यात, शेतकऱ्यांना मोफत बियाणे, खते व शेती अवजारे उपलब्ध करून द्यावीत, तसेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढीव दरांमध्ये तात्काळ कपात करावी, अशीही मागणीही या निवेदनातून करण्यात आली.


शेतकरी हा देशाचा अन्नदाता आणि अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका औसा तालुका काँग्रेस कमिटीने मांडली.यावेळी कॉग्रेस चे नेते श्रीशैल्य दादा उटगे,औसा तालुका कॉग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष किरण बाबळसुरे , आबासाहेब लोखंडे, दत्तोपंत सुर्यवंशी, अँड.शाहनवाज पटेल,अनीस जहागिरदार, अँड.फैय्याज पटेल,न्यामत लोहारे,आदि कॉग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या