100 % गुण घेतलेबद्दल अनुराग सावंत यांचा अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते भव्य सत्कार...

 100 % गुण घेतलेबद्दल अनुराग सावंत यांचा अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते भव्य सत्कार....................................................


.......

      जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ शैक्षणिक संकुल एम.आय.डी.सी. कॅम्पस लातूर द्वारा आयोजित "*लातूर पॅटर्न यशोशिखर सन्मान सोहळा 2026*" आयोजित करण्यात आला होता.

          परिश्रमांना सलाम,यशस्वीतेचा सन्मान हे ध्येय उराशी बाळगून  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत  *100 पैकी 100 %* गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा,पालकांचा व मुख्याध्यापकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

        चिरंजीव अनुराग सावंत यांनी 10 वी  बोर्ड परीक्षेत सर्व विषयात *100 पैकी 100 % गुण* घेतले बद्दल लातूरचे माजी आमदार मा.श्री. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या लातूर येथील जे.एस.पी.एम. कॉलेजमध्ये  संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.अजित शिवाजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते चि.अनुराग सावंत,पालक नेताजी सावंत व सौ.रंजना सावंत यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

         यावेळी मंचावर लातूर पॅटर्नचे प्रवक्ता तथा शाहू कॉलेजचे माजी प्राचार्य  अनिरुद्धजी जाधव,संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष मा. श्री.बाबुरावजी जाधव,ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार,दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी,महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ज्येष्ठ विधीज्ञ माधवराव पाटील टाकळीकर,लातूर मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशमुख मुख्याध्यापिका अरुणा कांदे,हनुमान विद्यालय शिवलीचे माजी मुख्याध्यापक संदीपान माळी,तसेच जे.एस. पी.एम.कॅम्पस मधील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गण,लातूर जिल्ह्यातील विविध भागातून आलेले विद्यार्थी,पालक , मुख्याध्यापक,शिक्षक गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या