योगिता सावंत बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम..

 योगिता सावंत बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम..


...........................................................................................

 श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय किल्लारी,ता.औसा,जि. लातूर या कॉलेजमध्ये इयत्ता 12 विज्ञान शाखेत शिक्षण घेणारी कु.योगिता नेताजी सावंत या विद्यार्थिनीने बारावी बोर्ड परीक्षेत 82.33 % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.  

      तर शिंदे सोहम दत्तात्रय याने ७९.३३% गुण घेऊन द्वितीय आणि काळे प्रसाद दिगंबर याने ७२.५० % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

       सावंत योगीताने यापूर्वी योगासन,जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रथम,राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक,इयत्ता तिसरीत MTS स्पर्धेत तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावणारी,इयत्ता पाचवीत स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावणारी , तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारी, शालेय जीवनातच तिने कराटेतील "ब्लॅक बेल्ट" मिळविणारी , "MSCIT" ही परीक्षा उत्तम श्रेणीत उत्तीर्ण  करणारी.या वर्षी "NEET" व "JEE"ची तयारी सुरू असताना प्रा.भगवान शिंदे सर व सोनवणे सरांच्या मार्ग दर्शनाखाली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागात धडक मारली.तर कराटे स्पर्धेत विभागातून प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर चौथा क्रमांक मिळविला.क्रीडा स्पर्धेकरीता एवढा वेळ खर्च करूनही तिने 12 वी बोर्ड परीक्षेत 82.33% गुण मिळवून श्री शिवाजी कॉलेज किल्लारीच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

लहानपणीच योगितावर मुक्तेश्वर विद्यालय औसा येथून संस्काराचे, अभ्यासाचे, व कडक शिस्तीचे बाळकडू मिळाल्यामुळे व आई वडीलांच्या संस्कारामुळे व शिवाजी कॉलेजमधील प्राचार्य रामराजे मार्गदर्शनामुळे व प्राध्यापकांनी घेतलेल्या अथक मेहनतीमुळे आज हे यशाचे शिखर गाठणे तिला शक्य झालेले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

 संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. गुंडप्पा बिराजदार,संस्थेचे सरचिटणीस मा.श्री. विजयकुमार सोनवणे, संस्थेचे कोषाध्यक्ष  मा.श्री.बब्रुवान माने,संस्थेचे चिटणीस मा.श्री.डॉ रवींद्र सोनवणे,संस्थेचे संचालक मा.श्री अमर भैय्या सोनवणे,मा.श्री रमेश हेळंबे,सर्व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री रामराजे सुर्यवंशी,पर्यवेक्षक श्री जाधव पी.जे.प्रा.शिंदे,इतर सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

         योगीताच्या या अष्ठपैलू व्यक्तिमत्त्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून तिचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या