वारकरी उत्सवातील कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा......
किशोर महाराज शिवणीकर
औसा-(सा.वा)दि.13
लातूर जिल्ह्यात खंडापूर येथे वारकरी संप्रदायाचा कुंभमेळा भरणार आहे.
सकल वारकरी संतांच्या पुण्यतिथी, जन्मोत्सव तसेच जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सदैह वैकुंठ गमनाचे 375 वे वर्ष निमित्ताने खूप मोठे आयोजन आहे.तरी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान किशोर महाराज शिवणीकर यांनी दैनिक सामनाशी बोलताना केले आहे.
या उत्सवात किमान पाच लाख वारकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. वारकरी हा शेतकरी आहे व शेतकरी हा वारकरी आहे. काळ्या आईची सेवा करणारा हा अठरापगड जातीतील कष्टकरी समाज काळ्या रंगाच्या पांडुरंगाला आपला प्राण समजतो अत्यंत वारकरी परंपरा शास्त्रशुद्ध फडकरी परंपरेने होणारा हा उत्सव आधुनिक जीवन पद्धतीला दिशा दर्शवणारा ठरणार आहे. उत्सव परंपरा सांभाळणारा असला तरी शेती ही आधुनिक असली पाहिजे आणि शेतकरी यांचा सर्वांगीण आर्थिक विकास व्हावा शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी लातूरच्या वारकरी उत्सवात महाराष्ट्रातील भव्य कृषी प्रदर्शनी आयोजित केली आहे असे किशोर महाराज शिवणीकर यांनी सांगितले त्यामुळे वारकऱ्यांनी म्हणजेच शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा तसेच सनातन वैदिक धर्म हा शेतीनिष्ठ असून कृषी संस्कृतीशी एकरूप आहे वारकरी सांप्रदाय तर कृषी संस्कृतीचे व्यापक स्वरूप आहे. त्यामुळे सर्वांनी आपला आध्यात्मिक अंतरिक भौतिक व सर्वांगीण सक्षम विकास करण्यासाठी लातूरच्या उत्सवात सहभागी होऊन या कृषी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आव्हान ह भ प किशोर महाराज शिवनीकर यांनी दैनिक सामनाशी बोलतांना माहिती दिली.

0 टिप्पण्या