*एन. बी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, औसा चे हिवाळी परीक्षा 2025 मध्ये घवघवीत यश.
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा 2025 च्या निकालात एन. बी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, औसा या महाविद्यालयाने यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल 89.84 टक्के लागला असून विविध विभागातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातून करपुडे सबरीन हिने 90.59 टक्के गुण मिळवत संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच संगणक प्रथम वर्षातून व्होगाडे अफिफा (87.65%) व द्वितीय वर्षातून बाबुडे मेहजबिन (83.29%) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
स्थापत्य अभियांत्रिकी विभागात प्रथम वर्षातून कांबळे प्रशांत (80.47%), द्वितीय वर्षातून फेरे प्रतीक्षा (75%) व तृतीय वर्षातून सय्यद सुहान (79.18%) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
विद्युत अभियांत्रिकी विभागात प्रथम वर्षातून देशमुख अजित (82.35%), द्वितीय वर्षातून पटेल कैफ (75%) तर तृतीय वर्षातून मुंडे गोविंद (79.78%) हे विद्यार्थी प्रथम आले.
यांत्रिक अभियांत्रिकी विभागातून प्रथम वर्षातून सूर्यवंशी सागर (80%), द्वितीय वर्षातून शेख अफान (68.44%) व तृतीय वर्षातून उपाध्य संकर्षण (76.12%) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा.श्री. संजयजी कुलकर्णी सर संस्थासचिव मा. श्री. डॉ. अफसर शेख साहेब , संस्थाप्रतिनिधी मा. श्री.सुलेमान अफसर शेख साहेब व शेख नाज मॅडम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री. लोहारेकर रहमत सर तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या