अनुराग सावंत राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत चौथा*.......

 * *अनुराग सावंत राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत चौथा*.......


             क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व छत्रपती संभाजी नगर जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय द्वारा विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजी नगर येथे राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत रुद्रा स्पोर्टस क्लब लातूरचा व श्रीकिशन सोमाणी विद्यालय लातूरचा विद्यार्थी चि.अनुराग सावंत यांनी ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेत 17 वर्षे (मुले)वयोगटातून चित्तथरारक योगासनाचे प्रत्यक्षिक करून शानदार पद्धतीने सेमी फायनल जिंकून फायनलमध्ये धडक दिली.व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने सहभागी 8(आठ) विभागापैकी 4(चार) विभागातील सर्व स्पर्धकावर  दणदणीत मात करून संपूर्ण महाराष्ट्रातून ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेत चौथा क्रमांक येण्याचा मान पटकाविला आहे.तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत यशाचे शिखर गाठण्यासाठी रुद्रा स्पोर्टस क्लबच्या संचालिका तथा अंतरराष्ट्रीय प्रशिक्षीका सौ.आशाताई झुंजे पाटील,जेष्ठ विधिज्ञ महादेवजी झुंजे पाटील , मलखांब तथा योगा प्रशिक्षक रामलिंग बिडवे,क्रीडा शिक्षिका रूपाली कांबळे,राठोड सर हाके सर संदीप मेळकुंदे सर, योगाचार्य विष्णुजी भूतडा , जिल्हाध्यक्ष रामजी घाडगे, योगेश सर,सागर सर,शुभांगीताई, सरोजनीताई यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष साहेब,सचिव साहेब,मुख्याध्यापक रमाकांतजी स्वामी साहेब, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील योगासनांच्या कारकीर्तीस शुभेच्छा दिल्या.

     तसेच अनुराग आणि  मार्गदर्शकांवर सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या