निकृष्ट कामांविरोधात औसा येथे भीम आर्मीचे आमरण उपोषण.
औसा शहरातील विविध विकास कामांमध्ये होत असलेल्या गैरव्यवहारांवर आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवर आवाज उठवण्यासाठी भीम आर्मीचे तालुका सहसंघटक सुनील जोगदंड यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर दिनांक 3 नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे.
“जोर-जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है!” या घोषणेसह भीम आर्मी व भारत एकता मिशन महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन खासदार एडव्होकेट चंद्रशेखर आझाद (संस्थापक अध्यक्ष, भीम आर्मी) यांच्या विचारांनी प्रेरित होऊन करण्यात आले आहे.या उपोषणात
उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे काय मागण्या केल्या आहेत ते खालील प्रमाणे
कडघर गल्लीतील वार्ड क्रमांक 10 मध्ये नालीचे व रस्त्याचे काम चालू आहे सदर काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून दर्जाचा रस्ता त्वरित नव्याने तयार करण्यात यावा.
नगरपरिषदेतील गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे.
शहरातील बोगस विकासकामे आणि निकृष्ट कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
नगर परिषदेत ‘क्लबिंग’ पद्धतीने करण्यात आलेल्या निविदा घोटाळ्याची सखोल चौकशी करावी.
विना टेंडर व विना वर्क ऑर्डर सुरू असलेल्या नवीन कामांना तात्काळ थांबवावे.
आमदार अभिमन्यू पवार यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू पार्क/पुतळा उभारणीचे आश्वासन त्वरित पूर्ण करावे.
अशा विविध मागण्यांसाठी भिम आर्मी चे कार्यकर्ते औसा नगरपरिषदे समोर उपोषणास बसले आहेत. यावेळी
उपोषणकर्त्यांनी इशारा दिला आहे की, जोपर्यंत त्यांच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील.या उपोषणाला
औसा येथिल एम आय एम पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड गफुरुल्ला हाश्मी, शहराध्यक्ष सय्यद कलीम व त्यांचे कार्यकर्ते यांनी भेट देऊन एम आय एम पक्षाच्या वतीने पाठिंबा दर्शवला असून, या उपोषणात भीम आर्मी चे विनोद कोल्हे,समाधान कांबळे,मैजोद्दीन शेख, सिद्धार्थ कांबळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.



0 टिप्पण्या