औसा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 15 तर सदस्य पदासाठी 146 अर्ज दाखल
औसा प्रतिनिधी
औसा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिनांक 17 नोव्हेंबर पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण 15 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून नगरपरिषद सदस्य पदासाठी एकूण 146 अर्ज दाखल झाले आहेत नगराध्यक्ष पद हे नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असून 11 प्रभागातून 23 सदस्य निवडून द्यायचे आहेत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एम आय एम,मनसे, राष्ट्रीय समाज पक्षासह काही अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे 17 नोव्हेंबर 2025 ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम अडसूळ यांनी दिली.

0 टिप्पण्या