औसा येथे नगराध्यक्ष पदासाठी एक तर सदस्य पदासाठी 10 अर्ज
औसा प्रतिनिधी
औसा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शेख परविन नवाबुद्दीन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक दोन मधून सौ. ऐश्वर्या पवनराज राचट्टे, प्रभाग चार मधून जरीना बागवान, प्रभाग सहा मधून महादेव कटके व आसमा अक्रम खान पठाण,प्रभाग सात मधून रूपाली धानुरे, प्रभाग नऊ मधून फातेमा उमर पंजेशा, प्रभाग 10 मधून नाझेमा शेख व उषा जाधव तर प्रभाग 11 मधून नसीमा बेगम सय्यद आणि सय्यद वसीम यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम अडसूळ यांनी दिली.

0 टिप्पण्या