शतायुषी निरंजन शिवाचार्य यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम..
औसा प्रतिनिधी
औसा येथील हिरेमठ संस्थानचे शतायुषी रंजन शिवाचार्य महाराज यांच्या अठराव्या पुण्यस्मरणानिमित्त समाधीस लघु व महारुद्र अभिषेक महिलांचे भजन परमरहस्यग्रंथाचे पारायण शिवभक्त परायण निळकंठ विभुते महाराज माळकोंडजी यांचे शिव किर्तन आणि जिंतूर मठाचे स्वर सम्राट श्री अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांची शिव कथा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या संगीतमय शिवकथेने पुण्यस्मरण सोहळ्याची सांगता शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी झाली हिरेमठ संस्थानचे मार्गदर्शक डॉक्टर शांत वीर शिवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि संस्थांचे मठाधिपती बाल तपस्वी निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली आयोजित कार्यक्रमानंतर हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त वीरशैव समाज आणि वीरशैव युवक संघटना औसा यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या