अजीम विद्यालयाचा अभिमान! डॉ. सुजित संजय मेटे NEET PG मध्ये घवघवीत यश संपादन करत वैद्यकीय क्षेत्रात चमकले.


 अजीम विद्यालयाचा अभिमान! डॉ. सुजित संजय मेटे NEET PG मध्ये घवघवीत यश संपादन करत वैद्यकीय क्षेत्रात चमकले.


औसा प्रतिनिधी 



अजीम विद्यालयातील एक झळकता तारा म्हणून ओळख निर्माण करणारे डॉ. सुजित संजय मेटे यांनी आपल्या उत्तुंग यशाने पुन्हा एकदा विद्यालयाच्या गौरवात भर घातली आहे. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. संजय मेटे सर यांचे सुपुत्र डॉ. सुजित मेटे यांनी इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण NBS अजीम विद्यालय, औसा येथे पूर्ण केल्यानंतर संभाजीनगर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) मधून MBBS पदवी प्राप्त केली.


नुकत्याच पार पडलेल्या NEET PG परीक्षेत त्यांनी उज्वल यश संपादन करत उत्तम रँक मिळवून पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या अफलातून यशामुळे अजीम विद्यालयाच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


गुरूंना शिष्याच्या यशाचा खरा आनंद असतो. डॉ. सुजित मेटे यांचा हा टप्पा त्यांच्या शिक्षक, पालक व संपूर्ण अजीम परिवारासाठी एक गौरवाचा क्षण आहे.


या उल्लेखनीय यशाबद्दल हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी, औसा चे सचिव डॉ. अफसर जी शेख साहेब, अध्यक्ष संजय जी कुलकर्णी सर, प्रतिनिधी सुलेमान शेख साहेब, मुख्याध्यापक शेख निजामोद्दीन साहेब, पर्यवेक्षक शेख टी. एम., मेटे एस. व्ही., डॉ. सिद्दीकी सर, निरीक्षक सय्यद हकीम सर, व अजीम विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांनी डॉ. सुजित मेटे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


विशेष बाब म्हणजे, त्यांची बहीण डॉ. सुजाता मेटे (MD) ही पण अजीम विद्यालयाची माजी विद्यार्थीनी असून, ती सध्या वैद्यकीय क्षेत्रात किडनी सुपर स्पेशालिस्ट म्हणून स्टार हॉस्पिटल, हैद्राबाद येथे यशस्वीरीत्या कार्यरत आहे. एकाच कुटुंबातील दोघांनी अजीम विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.


संपूर्ण अजीम परिवाराकडून दोघांनाही मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशासाठी शुभेच्छा!


गुणवंत व्हा, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या