औसा शहरात पालिकेचा अतिक्रमणाच्या विरोधात AIMIMचा एल्गार!

 औसा शहरात पालिकेचा अतिक्रमणाच्या विरोधात AIMIMचा एल्गार!



औसा प्रतिनिधी: 


औसा शहरात अतिक्रमणाच्या नावाखाली विशेषतः अल्पसंख्याक वस्तीवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत आज दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी AIMIM पक्षाच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पक्षाचे माजी औसा शहर प्रमुख  अ‍ॅड. गफुरउल्ला हाशमी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.


निवेदनात सांगण्यात आले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निरदेशा नुसार पावसाळ्यात अतिक्रमण न काढण्याच्या स्पष्ट निर्देशांची पायमल्ली करत नगरपालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कारवाई केली जात आहे. ही कारवाई विशेषतः अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये लक्ष करून केली जात असून इतर भागांतील अतिक्रमण मात्र दुर्लक्षित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


विशेषतः मौलाना अबुल कलाम आझाद चौक येथे गरीब चिकन विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांना उपासमारीच्या उंबरठ्यावर आणल्याचे AIMIMने स्पष्ट केले. या विक्रेत्यांचे पुनर्वसन करून त्यांना तेथेच कायम जागा देण्यात यावी, अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.


निवेदन देताना एआयएमआयएम चे सय्यद कलिम,  सय्यद जमिरोद्दीन , शकील देशमुख, बागवान सैफुल्लाह , अब्दुल रहीम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या