औसा तालुक्यातील भादा येथे सिरातुन्नबींच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...
>>> मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन पद्धतीचे आचरण करा - मौलाना कलिमुल्लाह शाह
औसा प्रतिनिधी : - . औसा तालुक्यातील भादा येथे सिरातुन्नबींच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून यावेळी सध्याच्या जीवन शैलीत हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन पद्धतीचे आचरण केल्यास यश प्राप्त होईल असे प्रतिपादन हजरत मौलाना कलिमुल्लाह शाह यांनी केले आहे.
तालुक्यातील मौजे भादा येथे १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०७ : ०० वाजता सिरातुन्नबींच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रम भादा येथील जामा मस्जिद मध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मौलाना कलिमुल्लाह शाह यांनी आपले मत व्यक्त करताना त्यांनी वेगवेगळ्या विषयावर उपस्थित नागरिकांना प्रबोधन केले. पुढे म्हणाले की, विद्यार्थ्याला कोणत्याही विषयात पदवी घेऊ द्या, परंतु या पदवी सोबत मानवता धर्म शिकवणाऱे शिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना एकमेकांविषयी आपुलकी त्याचबरोबर इतरांचा आदर, इतर जातीय धर्मां विषयी आपुलकी याचे शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून औसा शहरातील तक्वियतुल इमान या मदरश्याचे नाजीम मौलाना अमीर इशाआती लाभले.तसेच मौलाना मुबीन शेख, मौलाना परवेझ, मौलाना मुसा, मौलाना गौस आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मौलानांनी सांगितले की, मोहम्मद पैगंबर यांनी आपल्या जीवनात कशा पद्धतीचे आचरण केले व इतरांविषयी कसा आदर बाळाला याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. मुलांचे प्राथमिक शिक्षण हे आईच्या सानिध्यात घडून येत असते, म्हणून आईने सुसंस्कृत असे शिक्षण लहानपणीच आपल्या मुलांना दिले पाहिजे असेही त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना सांगितले.
या कार्यक्रमाला गावातील महिलांसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्यांना गावातील होतकरू युवकांनी बक्षीस स्वरूपात व कपडे व बॅग चे वाटप केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील सर्वच नागरिकांनी आपले मोलाचे योगदान दिले व परिश्रम करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
0 टिप्पण्या