NBS अजीम च्या गरीब, होतकरू विद्यार्थीनीना औसा चे सुपुत्र ऋषिकेश पाटील (वृक्षवल्ली परिवार, पुणे ) तर्फे सायकलीचे वाटप.......
भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिन उत्साहात संपन्न, या निमित्त पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्य करणारे, औसा जन्मभूमी असणारे ऋषिकेश पाटील साहेब,सौ. उत्तरा पाटील, मुलगा सौमित्र पाटील व त्यांच्या वृक्षवल्ली परिवाराने आज अजीम हायस्कुल ला भेट देऊन, शाळेतील गरीब, होतकरू विद्यार्थिनाना सायकल वाटप करण्यात आल्या..
गरीब मुली शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच सायकल वापरल्याने एक व्यायाम तर होतोच शिवाय निसर्गातील प्रदूषण देखील कमी होते, ही प्राथमिक भावना ठेऊन, उदात्त हेतूने दरवर्षी औसा शहरातील चार ते पाच शाळेत जवळपास 25 सायकलीचे वाटप करण्यात येते.
जन्मभूमी औसा शी नाळ जपणारा युवक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक शेख निजोमोद्दीन साहेब व पर्यवेक्षक श्री. शेख दानिश सर, यांनी केले... अजीम शाळेतील 1)कु.जाधव माऊली गणेश... वर्ग 5 वा
2)कु.शेख सदफ इकबाल... वर्ग 7 वा
3)कु.शेख मंतशा इस्माईल... वर्ग 9 वा
4) कु.शेख तहुरा फेरोज... वर्ग 7 वा
5)कु.शेख हसीना रियाज... वर्ग 7 वा
या गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आली.व ऋषिकेश पाटील व वाहिनीसाहेब उत्तरा पाटील मॅडम यांच्या हस्ते झाडाला राखी बांधून पर्यावरण जपण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री. शेख टी. एम., श्री. मेटे एस. व्ही.व डॉ. सिद्दीकी सर उपस्थित होते, या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू उपस्थित होते
0 टिप्पण्या