अतिवृष्टीने बाधित शेती पिकांचे तातडीने पंचनामे करावे
आ अभिमन्यू पवार यांची आढावा बैठकीत सूचना
औसा - गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे औसा मतदारसंघातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे तसेच रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांनी (दि. २८) रोजी औसा येथे प्रशासकीय बैठक घेऊन या परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
या दोन दिवसात जिल्ह्यातील विविध भागात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला असून औसा तालुक्यातील लामजना व किल्लारी या दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे या दोन्ही मंडळात ७२ सेमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे तसेच या पावसामुळे तालुक्यातील काही भागातील पुलावरून पाणी वाहत असल्याने काही वेळेसाठी वाहतूक बंद झाली आहे एकंदरीत या परिस्थितीमुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी बुधवारी तातडीने प्रशासकीय आढावा बैठक घेऊन या सर्व परिस्थितीची माहिती घेतली. तसेच "अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, जिथे रस्ते/पूल इ. चे नुकसान झाले आहे तिथे पाऊस ओसरल्यानंतर प्राधान्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, ज्या रस्त्यांवरून/पुलांवरून धोकादायक पातळीवरून पाणी वाहत आहे त्या ठिकाणी पोलीस नियुक्ती करून संभाव्य धोके टाळावे आणि नदीपात्राशेजारील गावांमधील पूर परिस्थितीवर प्रशासनाने सतर्क राहून लक्ष ठेवावे" अशा सूचना प्रशासनाला दिल्या.तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील चौधरी आदीसह विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
...........
0 टिप्पण्या