शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा लातूर दौरा
लातूर, दि. 26 जुलै 2025 —
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक व महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंडळाचे माजी राज्यमंत्री मा. रविकांत तुपकर हे दिनांक 26 जुलै 2025 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी रात्री 11:00 वाजता शासकीय विश्रामगृह, औसा येथे मुक्काम ठेवलेला आहे. त्यांच्या पुढील कार्यक्रमांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
🔸 27 जुलै 2025 – रविवारीचा दौरा कार्यक्रम:
▪ सकाळी 9:00 वाजता – औसा शहरातील प्रमुख मान्यवरांसोबत विशेष बैठक
▪ सकाळी 9:45 वाजता – लातूरकडे प्रयाण
▪ सकाळी 10:00 वाजता – अपोलो हॉस्पिटल, लातूर येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांची सदिच्छा भेट व प्रकृतीची विचारपूस
▪ यानंतर – पत्रकारांशी संवाद
▪ दुपारी 2:00 वाजता – हाडोळती, तालुका अहमदपूर येथे शेतकरी अंबादास पवार यांच्या शेतावर शेती विषयक चर्चा
या दौऱ्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. राजीव कसबे, कोअर कमिटी सदस्य श्री. राजेंद्र मोरे, सत्तार पटेल आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ही माहिती लातूर जिल्हाध्यक्ष श्री. अरुण दादा कुलकर्णी व युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. प्रज्योत हुडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
0 टिप्पण्या