*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त औसा येथे विविध स्पर्धांचेआयोजन.*
औसा प्रतिनिधी -साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी सकाळी दहा वाजता येथील श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालय औसा येथे शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकला निबंध बुद्धिबळ रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड परीक्षित अभिमन्यू पवार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगते पत्रकार राम कांबळे माजी नगरसेविका ॲड मंजुषा हजारे माजी नगरसेवक लहू कांबळे आणि गोपाळ धानोरे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे शिवराज राजुरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालय औसा येथे आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमध्ये श्री मुक्तेश्वर विद्यालय श्री वीरभद्रेश्वर प्रशाला अजीम हायस्कूल व इतर शाळेतील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींनी भर पावसात उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला दिवसभर पावसाचे वातावरण असताना शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या शिक्षकांनी शिस्तीत विद्यार्थ्यांना या विविध स्पर्धेसाठी उपस्थित केल्याबद्दल जयंती समिती व स्पर्धा संयोजन समितीने स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक अंगद कांबळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीचे अध्यक्ष रवी कसबे कोषाध्यक्ष युवराज कसबे संयोजक दत्तात्रेय पुंड पवन कांबळे रोहित जाधव सुरज शिंदे सुशील बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या