दिव्यांगांना शिधा वाटप करताना प्राधान्य देण्याच्या सूचना..

 दिव्यांगांना शिधा वाटप करताना प्राधान्य देण्याच्या सूचना..



 औसा प्रतिनिधी 


सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातून पात्र शिधापत्रिकेवरील धान्य वितरण करीत असताना दिव्यांगणा रांगेत उभे न करता प्राधान्याने धान्य वितरित करावे तसेच वितरण सुरू झाल्यानंतर एसएमएस किंवा फोन द्वारे कळवावे त्यांना रांगेत उभा न करता प्राधान्याने धान्य द्यावे तसेच दिव्यांगाचे बायोमेट्रिक अंगठा लागत नसल्यास त्यांना ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरण करावे अशी मागणी अशोक देशमाने यांनी तहसीलदार असा यांच्याकडे केली होती अशोक देशमाने यांच्या मागणीची दखल घेऊन तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना लेखी पत्र देऊन दिव्यांगांना स्वस्त धान्य दुकानातून मालाचे वितरण करत असताना प्राधान्य द्यावे अशा सूचना दिली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या