संजय नगर बॅक कॉलोनीतिल खंदलेले खड्डे व्यवस्थित बुजवा - उमर पंजेशा युवा मंचची मागणी.

 संजय नगर बॅक कॉलोनीतिल खंदलेले खड्डे व्यवस्थित बुजवा -

उमर पंजेशा युवा मंचची मागणी.





औसा प्रतिनिधी 

संजय नगर, बँक कॉलोनीच्या बाजूला नवीन पाईप लाइन टाकण्यासाठी खंदलेले खड्डे व्यवस्थित बुजविण्यात आले नसल्याने तेथे वाहनांना व नागरिकांना येण्याजाण्यास अडचण होत असून वाहन फसत आहेत खड्ड्याची खोली 2 फूट असून त्यामध्ये पाणी साचल्याने त्याखड्डाचा अंदाज येत नसल्याने वाहन फसत, पलटी होत आहे ते खड्डा मुरुम टाकून बुजवावे .

अलीम करपुडे ते वाजीद चौधरी यांच्या घरा पर्यंत त्यांभागातील नागरिकांना गेल्या दहा वर्षांपासून नळाला पाणी त्या भागात नवीन पाईप लाइन टाकून देण्यासाठी व सुरतशाह शाळेपासून मोमीन गल्ली पर्यंत नाली मध्ये असलेली पाईप लाइन बाजूला पुरून टाकण्यात यावी. 

पावसाळ्याचे दिवस असून डासांचा प्रादुर्भाव वाढत असून आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे धूर फवारणी पावडर टाकून डासांचे प्रमाण कमी करावे . मोमीन गल्ली येथील व परिसरातील विद्युत पोल वरील बंद असलेल्या लाईट चालू करण्यात यावे. 

 मोमीन गल्ली येथील बोर चे पाईप लिकीज असुन त्याद्वारे पाणी वाया जात ते दुरुस्त करावे. 

 सध्या शहरात नळाला येत असलेले गढूळ पाणी स्वच्छ करून पुरवठा करावे .

 मुरुम चे टेंडर काढून शहरातील  गरज आहे तेथे नवीन व जुन्यभागात मुरुम टाकून नागरिकांना येण्याजान्यासाठी अडचण निर्माण होऊ नये. या विविध मागण्यांचे निवेदन 

. *मुख्याधिकारी यांना  उमर पंजेशा युवा मंचच्या वतीने  दिले असून लवकरात लवकरच हे सर्व विषय मार्गी लावण्यात यावे ही विनंती करण्यात आली .

अलीम करपुडे ते वाजीद चौधरी व सुरतशाह शाळेपासून मोमीन गल्ली पर्यंत नालीतून गेलेली पाईप लाइन हे दोन विषय सर्व यंत्रणा कामाला लागली असताना  पाणीपुरवठा इंजिनियर यांची बदली झाल्याने काम थांबले आहे, *न. पा.अधिकाऱ्यांच्या* उदासीनतेमुळे  समस्याची सोडवणूक होत नसून 

उमर भाई पंजेशा युवा मंच तर्फे  प्रशासन विरोधात 

आंदोलन करण्यात येईल

 असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या