भादा येथील 'आधार' प्रतिष्ठान कडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..
औसा प्रतिनिधी
औसा:तालुक्यातील भादा येथील आधार प्रतिष्ठान सेवाभावी संस्था या संस्थेकडून संस्थेच्या (इ. सन 2020)स्थापनेपासूनच सामाजिक कार्याचा वसा घेऊन चालणाऱ्या या संस्थेचे सामाजिक कार्य हे दिवसेंदिवस सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठे आशादायी आणि आधारस्तंभ ठरत असल्याचे चित्र सध्या भादा व परिसरामध्ये दिसून येत आहे. भादा येथील आधार प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेची स्थापना गावातील तरुणांकडून एका वैचारिकतेच्या आधारे सर्व समावेशक अशी वैचारिकता एकत्रित येऊन या संस्थेची निर्मिती सेवाभाव याच उद्देशाने झालेली आहे त्या सेवाभावाची प्रचिती देणारे आतापर्यंतचे कार्य या संस्थेमार्फत संस्था निर्मितीपासूनच सुरू आहे.यामध्ये ही संस्था गावापूर्ती मर्यादित नसून राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत कार्य करण्याचा उद्देश या संस्थेचा आहे.यामुळे या संस्थेकडून कृषी, शिक्षण आणि आरोग्य या तीन मुख्य उद्दिष्ट ना पकडून ही संस्था कार्य करीत आहे.याच कार्याची एक भाग म्हणून सोमवार दिनांक 23 जून 20 25 रोजी औसा तालुका भादा येथील आनंदनगर शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीची शाळेची बॅग आणि पिण्यासाठी आवश्यक असणारी पाणी बॉटल,6 वह्याचे बंडल आणि पेन याचे वितरण करण्यात आले.यावेळी..
"शाळेला गावाचा आधार असावा अन् गावाला शाळेचा अभिमान वाटावा"......जिल्हा
परिषद प्राथमिक शाळा आनंदनगर भादा येथे आधार प्रतिष्ठानच्या वतीने शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी या संस्थेचे मुख्य प्रवर्तक रविशंकर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सतत पाठपुराव्याच्या नियोजनाने आधार प्रतिष्ठानचे सक्रिय पदाधिकारी यामध्ये उपाध्यक्ष मनोज पाटील, प्रशांत पाटील, बी डी उबाळे,सुनील राऊत,दीपक मांनधणे,प्रल्हाद लटूरे,रियाज खोजे,शमशोद्दीन खोजे,पांडुरंग बनसोडे,यांच्यासह
भादा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव तसेच औसा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी बिराजदार बि.डी, माजी पंचायत समिती सदस्य पद्माकर चिंचोलकर, भादा उपसरपंच बालाजी शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, ग्राम पंचायत सदस्य अमोल पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील गिरी ,उपाध्यक्ष रेवण गायकवाड,सोसायटीचे व्हाईस चेअरमन महेश गायकवाड,भेटा केंद्राच्या केंद्रप्रमुख गिरी के एन मॅडम, आलमला केंद्राचे केंद्रप्रमुख जगताप सर, गंगापूर केंद्राचे माजी केंद्रीय मुख्याध्यापक भारती सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, महेश कांबळे, श्रीहरी जाधव, आणि शाळेतील सर्व स्टाफ यांच्या सह गावातील शिक्षण प्रेमी, पालक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
0 टिप्पण्या