गंजलेले विद्युत पोल तात्काळ बदलण्याची मागणी..खुंदमीर मुल्ला
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील मोमीन गल्ली येथील दिलावर तत्तापुरे ,सत्तार करपुडे व शहरातील इतर ठिकाणी गंजलेले विद्युत पोल 40 ते 50 वर्षांपूर्वीचे असून ते
पूर्णपणे गंजलेले असून त्यांची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. पावसाळ्याच्या काळात हे पोल कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे परिसरातील नागरिकांचे प्राण आणि मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे.
या गंजलेल्या पोलांमुळे वीजपुरवठाही वारंवार खंडित होतो आहे, ज्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तरी आपणास विनंती आहे की, सदर गंजलेले पोल तात्काळ बदलण्याची कार्यवाही करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.अशी मागणी औसा शहर काँग्रेस कमिटीचे शहर कार्याध्यक्ष खुंदमीर मुल्ला यानी महावितरण कार्यालयचे साह्यायक अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या