भादा रोडचे सहा महिन्यापूर्वी काम होऊनही कारपेटला मूहूर्त मिळेना वाहन चालक त्रस्त..

 भादा रोडचे सहा महिन्यापूर्वी काम होऊनही कारपेटला मूहूर्त मिळेना वाहन चालक त्रस्त..


 औसा प्रतिनिधी 

औसा शहरापासून भादा रोडचे सहा किलोमीटर अंतराचे अनेक दिवसापासून रखडलेले काम पाच ते सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाले आहे या रस्त्याचे काम अनेक कारणांनी रखडले होते अखेर पाच-सहा महिन्यांपूर्वी या कामाला सुरुवात झाली परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्ट्या होणे आवश्यक असताना थातूरमातूर मुरूम टाकून साईड पट्ट्या भरण्याचे काम कंत्राट दराने उरकून घेतले आहे रस्त्यावरील पावसाच्या पाण्यात योग्य तो उतार काढून न दिल्यामुळे हा रस्ता पुन्हा पावसाळ्यात खचण्याची शक्यता आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच हा रस्ता उघडण्यास सुरुवात झाली असून सहा महिन्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होऊनही पावसाळा आला तरी सहा किलोमीटर अंतराच्या या रस्त्यांच्या कार्पेटला मूहूर्त मिळेना औसा शहरापासून सहा किलोमीटर अंतराचा हा रस्ता वाहनचालकांना धडधड आदळत प्रवास करावा लागत आहे. संबंधितांनी या कामी लक्ष देऊन कंत्राटदारांना  तातडीने सूचना कराव्या आणि या रस्त्याच्या कार्पेटचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी या परिसरातील जनता व वाहनचालक करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या