कृषी दुकानदारांनी मोफत बियाणांचे फलक लावा- सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
शासनाकडून देत असलेले बियाणे अनुदान व मोफत बियाणांचे फलक लावण्याकरीता कृषि दुकानदारांना आदेश करणे बाबत एम आय एम च्या वतीने निवेदन देण्यात आले त्याचे सविस्तर वृत्त असे
आँनलाईन केलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी मोफत बियाने उपलब्ध करुन देण्यात आलेली परंतु औसा शहरासह तालुक्यातील कृषि दुकानदार हे सदर मोफत बियाणांचे फलक दुकानात लावत नाहीत यामुळे शेतकऱ्यांना याबद्दल माहिती मिळत नाही. व शासनाच्या लाभापासुन वंचित राहत आहेत.
तरी कृषि दुकानादारांना उपलब्ध बियाणांचे व मोफत बियाणांचे फलक लावण्याबाबत बंधनकारक करुन त्यांना तसे कडक निर्देश देण्यात यावेत.अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी कृषी अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
0 टिप्पण्या