औसा येथे महाराणा प्रताप जयंती साजरी..
औसा प्रतिनिधी
क्षत्रिय राजपूत महासभा औसा तालुका यांच्या वतीने औसा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ वीर शिरोमणी सूर्यपुत्र महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन तहसीलदार घनश्याम अडसूळ यांच्या हस्ते व हृदयरोग तज्ञ डॉक्टर बजरंग दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. महाराणा प्रताप जयंती निमित्त क्षत्रिय राजपूत महासभेच्या वतीने राजपूत समाजातील मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष मुक्ता, प्रदीप मोरे, क्षेत्रीय राजपूत महासभेचे औसा अध्यक्ष संतोष वर्मा, धर्मेंद्र बीसीनी, जयसिंग चव्हाण, शंकर सिंह चव्हाण, सिद्धेश्वर गवळी, समीर डेंग, गोपाळ धानोरे, संभाजी शिंदे, जगदीश चव्हाण, राम शिलेदार, हनुमंत कांबळे, राम कांबळे, माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, शिवरुद्र मुर्गे, सोसायटीचे चेअरमन गीतेश शिंदे, व्हाईस चेअरमन सनाउल्ला शेख, सुनील उटगे, रणजीत चव्हाण, युवराज चव्हाण यांच्यासह विविध समाजाचे अध्यक्ष व क्षत्रिय राजपूत महासभेचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या