श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर जीर्णोद्धार निमित्त सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे प्रवचन संपन्न..

 श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर जीर्णोद्धार निमित्त सद्गगुरू हिनीनाथ महाराज औसेकर यांचे प्रवचन संपन्न..


औसा प्रतिनिधी 

माळी गल्ली औसा येथील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराचा किरणोतदार नरसिंह भक्ताच्या प्रयत्नातून करण्यात आला असून श्री लक्ष्मी नरसिंह मूर्तीची नगर प्रदक्षिणा दिंडी काढून विधिवत मूर्तीची स्थापना हिरेमठ संस्थानचे पिठाची पती बाल तपासणी निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये करण्यात आली. मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व महिला भजन असा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शनिवार दिनांक 10  मे 2025 रोजी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी महिला भजन कार्यक्रमात टाळ वाजवीत उस्फुर्त सहभाग घेतला. रात्री आठ वाजता पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहा अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ  महाराज औसेकर यांचे दिव्य प्रवचन झाले. सदगुरु गहिनीनाथ  महाराज औसेकर यांनी श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या निर्णोद्धाराची पाहणी करून समाधान व्यक्त केले येथील भाविक भक्तांनी अतिशय सुंदर रित्या मंदिराच्या जिर्णोद्धार करून रेखीव मूर्तीची स्थापना केल्याबद्दल सदिच्छा दिल्या. यावेळी सर्वश्री धनंजय कोपरे, शिवलिंग आप्पा शिंदे, वैजनाथ शिंदे, वीरभद्र शिंधुरे, किरण औटी, जगदीश स्वामी, अमर मनगुळे, धोंडीराम औटी, त्रिंबक औटी, शुभम पडसलगे, विरभद्र कोपरे, शिवराज कोपरे, रविराज कोपरे यांनी  सदगुरु गहिनीनाथ महाराज यांचा सत्कार केला  प्रवचन कार्यक्रमास शेकडो नरसिंह भक्त व महिला उपस्थित होत्या. श्री लक्ष्मी नरसिंह जीर्णोद्धार समिती व केशरी या मित्र मंडळाच्या वतीने भाविक भक्तासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या