दादा-गिरी"स्वतःपुरती मर्यादित ठेवुन महिलांचे प्रश्न सोडवणयास प्राधान्य द्यावे- जयश्रीताई उटगे

 "दादा-गिरी"स्वतःपुरती मर्यादित ठेवुन महिलांचे प्रश्न सोडवणयास प्राधान्य द्यावे- जयश्रीताई उटगे 


औसा प्रतिनिधी 

वैष्णवी हगवणे प्रकरणी लातूर (ग्रामीण) जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका जयश्रीताई उटगे यांच्या सह शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱी सरोजाताई गायकवाड, रेखाताई पुजारी, नंदा गाडे , अरुणाताई माने ,दैवता ताई सगर,पार्वती भिसे ,नागीण सुरवसे, पदमीन पिंगळे, पार्वती कांबळे,पुनम बनसोडे यांनी निवेदन दिले.

वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या सासरच्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.तसेच मुख्यमंत्री महोदयांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची त्वरित त्या पदावरून हाकालपट्टी करून त्या ठिकाणी एक अभ्यासू महिलेची नियुक्ती करावी, जेणेकरून महिलांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला गती येईल . वैष्णवी यांच्या सासरच्या मंडळीचे वकीलपत्र स्वीकारणाऱ्या वकिलाचेही आम्ही निषेध करतो. महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना धमकावणाऱ्या "ठिल्लर" व्यक्तींचा या ठिकाणी जाहीर निषेध करून चाकणकर यांनी आपली"दादा -गिरी" स्वतःपुरतीच मर्यादित ठेवावी.असा मोलाचा सल्ला ही सदरील निवेदनाद्वारे देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या