वक्फ बिल दुरुस्ती विधेयकास मान्यता न देता ते रद्द करा - लोकसत्ता युवा संघटनेची मागणी..

 वक्फ बिल दुरुस्ती विधेयकास मान्यता न देता ते रद्द करा - लोकसत्ता युवा संघटनेची मागणी..



लातूर 

 वक्फ बील दुरुस्ती विधेयक लोकसभा, राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आले आणि मा. राष्ट्रपती यांच्या मान्यतेसाठी आपल्याकडे पाठविण्यात आले आहे ते बील असंविधानिक आहे. तसेच हे बिल मंजूर झाल्यामुळे अल्पसंख्यांक मुस्लीम समाजातील जेष्ठ नागरिक, महिला व मुलां-बाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.


तरी वक्फ दुरुस्ती विधेयकास मान्यता न देता ते रद्द करावे, अशी मागणी लोकसत्ता युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ईलाही बशीरसाब शेख,अस्लम शेख,उमरभाई कलाल,ईरफान कुरेशी,आसिफ निचलकर, जमीर पठाण आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या