आ अभिमन्यू पवारांचा यशस्वी पाठपुरावा..
लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जून २०२५ पासून सुरु करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.
लातूर - लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी २०२३ पासून आमदार अभिमन्यू पवार करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली (दि.१५) एप्रिल रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लातूर शासकीय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय २०२५ पासून सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीवरून लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली होती , या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदरील प्रस्ताव अर्थ मंत्रालयात प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ११ मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची आमदार अभिमन्यू पवार यांनी विधिमंडळ प्रांगणात भेट घेऊन त्यांनाही हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानंतर १८ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता.२०२३ पासून आमदार अभिमन्यू पवार करत असलेल्या या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लातूर शासकीय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय २०२५ पासून सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. लातूर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते पण लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून महागडे शिक्षण घ्यावे लागते. लातूर अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु झाल्यानंतर लातूरसह धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याचे स्वप्न पूर्ण होत असून लातूर च्या इंजिनिअर आणि एज्युकेशन हब मध्ये भर पडणार आहे.विकासाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे हे निश्चित.लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जून २०२५ पासून सुरु करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे आभार मानले आहेत.
..............
0 टिप्पण्या