विमा कंपनीचा अजब कारभार; शेतकऱ्याची कंपनीकडे तक्रार..

 विमा कंपनीचा अजब कारभार; शेतकऱ्याची कंपनीकडे तक्रार..




औसा -(सा. वा.)दि.21

खरीप हंगाम 2024 मध्ये तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील नुकसानीचा नुकसान भरपाई मिळावी म्हणून विमा कंपनीकडे हजारो रुपये भरले परंतु विमा कंपनीने ज्या शेतकऱ्याचे नुकसान जास्त त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई पोटी कमी रक्कम दिली तर ज्या शेतकऱ्याचे नुकसान कमी अशा शेतकऱ्यांना जास्त मावेजा देऊन अजबच कारभार केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की लखनगाव तालुका औसा येथील शेतकरी बालाजी गणपती कदम हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या नावे गट नंबर 116 मध्ये 0.87 आर जमीन आहे पैकी 85 आर सोयाबीन विमा भरलेला आहे पण विमा कंपनीने 8700 रुपये  देऊन विमा कंपनीने त्यांची बोळवण  करून कहरच केलेला आहे.

ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई देऊन कहरच केला आहे तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान कमी अशा शेतकऱ्यांना मात्र जास्तीचा पिक विमा मंजूर करून खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचे पाप विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कृषी खात्याने केली असल्याची तक्रार तालुक्यातील लखनगाव येथील शेतकरी बालाजी गणपती कदम यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली आहे तर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून दाद मागितली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या