औसा पोस्ट ऑफिस चा आज लोकार्पण सोहळा..
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील सब पोस्ट ऑफिसच्या स्वतंत्र मालकीची जागा असून मागील अनेक वर्षा पासून इमारतीची दुरावस्था झाल्यामुळे सब पोस्ट ऑफिस चा कारभार भाड्याच्या इमारतीत चालत होता. औसा तालुक्यातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तसेच सामाजिक संघटना यांनी पोस्ट ऑफिस ची स्वतंत्र इमारत व्हावी म्हणून सातत्याने मागणी केली होती भाड्याच्या इमारतीत सब पोस्ट ऑफिस चा अनेक वर्षे चाललेला कारभार सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचा ठरत होता. केंद्र सरकारने अखेर औसा शहरातील सब पोस्ट ऑफिसच्या उभारणीसाठी निर्णय घेतला आणि टपाल कार्यालयाच्या मालकीच्या जागेत सुसज्ज इमारत कामकाजासाठी तयार झाली असून या इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी दहा वाजता धाराशिव चे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे, तरी तालुक्यातील नागरिकांनी सब पोस्ट ऑफिसच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन संजय आंबेकर डाकघर अधीक्षक धाराशिव मुख्य कार्यालय लातूर यांच्यावतीने करण्यात येते.
0 टिप्पण्या