औसा शिक्षक पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न..
औसा प्रतिनिधी
औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले व महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे* औचित्य साधून औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन
करण्यात आले होते.त्या अनुषंगाने दिनांक 17 एप्रिल 2025 गुरुवार रोजी औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालय येथे सकाळी साडे आठ ते 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात आले.या रक्तदान शिबिरांचे शुभारंभ औसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी गोविंद राठोड, व रमेश सगर सहाय्यक निबंध औसा, अरुण निगुडगे तालुका अधिकारी शासकीय एडिटर विभाग औसा यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी एवढ्या तीव्र उन्हात अपेक्षेपेक्षा जास्त यांनी 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले व पतसंस्थेच्या या उदात्त उपक्रमात मोलाचे योगदान दिले.
*या शिबिरात जवळपास दिवसभरात 150 ते 200 लोकांनी शिक्षकभवन येथे उपस्थिती नोंदवली होती.निर्भयपणे अनेक शंका कुशंकाना फाटा देत स्वयंप्रेरणेने सर्व महादाते आले होते.परंतु यांपैकी ब-याच जनांना मधुमेह, रक्तदाब व इतर विकार असले कारणाने ते रक्तदान करू शकले नाहीत. तरी परंतु ज्यांना इच्छा असुनही रक्तदान करता आले नाही त्यांनी आपल्या* *पत्नीस,परिवारातील इतर सदस्य व मित्र मंडळीस रक्तदान करण्यासाठी* *आणलेच व या उदात्त कार्यात आपले योगदान दिले.*
या वर्षीच्या रक्तदान शिबीरात *महिला रक्तदात्यांनी ही मोठ्या प्रमाणात रक्तदान करणार होते .*
महिला भगिनी शक्यतो अनेक शंका कुशंका मुळे रक्तदान करीत नाहीत परंतु यावेळी महिला भगिनींची उपस्थिती ही लक्षणीय होती.परंतु त्यांच्याही आरोग्य विषयक अडचणी मुळे ब-याच महिला भगिनींना नाईलाजाने रक्तदान करण्यास रक्तपेढीच्या डॉक्टर्स नी मनाई केली.
त्यामुळे इच्छा असतानाही अनेक महिला भगिनी रक्तदान करू शकल्या नाहीत.परंतु आपल्या सहकारी शिक्षक बंधुभगिनींच्या रक्तदान करतेसमयी अनेक शिक्षक सहकारी बंधुभगिनी फोटोसेशन करून त्यांचे कौतुक करत होते.
या शिबिरादरम्यान *औसाचे तहसीलदार सन्माननीय घनश्याम अडसूळ व इतर विविध प्रभागातील सन्माननीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन रक्तदात्यांचे व पतसंस्थेच्या या अत्यन्त उपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.
*औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था मा.चेअरमन खिचडे महादेव सर,व्हाईस चेअरमन बोने हरिश सर ,सचिव जगताप संजय सर यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवत असते त्यापैकी हा महादान-रक्तदानाचा हा उपक्रम अतिशय उदात्त व मानवोपयोगी आहे.*
या वेळी रक्तदात्यांना लगेचच
*सुंदर आकर्षक प्रमाणपत्र देऊन त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.*
*शिबिराचा समारोप श्याम वाखडे (उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, जि.प लातूर) यांनी केले , त्यांनी पतसंस्थेच्या या उपक्रमाचे व पारदर्शक वैशिष्ट्य पूर्ण कारभाराचे कौतुक केले. शिक्षक नेते सुभाष मस्के सर, संतोष पिठ्ठलवाड सर संजीवनी ब्लड बँकेचे संस्थापक विनायक सावंत सर उपस्थित होते.*
उन्हाळ्याच्या या दिवसात चांगले रक्तदान झाल्यामुळे पतसंस्थेतर्फे सर्व रक्तदाते,उपस्थित शिक्षक सभासद बंधुभगिनी ,रक्तपेढीचे संपुर्ण स्टाफ यांचे आभार व ऋण व्यक्त करण्यात आले.
या विक्रमी महादान यज्ञात
*मा .खिचडे महादेव सर(चेअरमन)*
*मा.बोने हरिश सर(व्हाईस चेअरमन)*
*मा.जगताप संजय सर(सचिव)*
संचालक
*संजय रोडगे सर, दीपक डोंगरे सर रमेश जाधव सर*
*युसुफ पिरजादे सर*
*धिरज रूकमे सर*
*मधुकर गोरे सर*
*अमोल शेळके सर*
*महेश कांबळे सर*
संचालिका
*संगिताताई कानडे मँडम*
*मंदाकिनी ताई माने मँडम*
सर्व माजी संचालक,सेवाभावी शिक्षक बंधुभगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 टिप्पण्या