जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्षपदी अजय शेटे

 जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्षपदी अजय शेटे 



औसा - प्रतिनिधी-


 बाराव्या शतकातील मानवता धर्माचे पुरस्कर्ते थोर क्रांतिकारक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या स्मृतीला आणि कार्याला उजाळा देण्यासाठी औसा शहरात विविध उपक्रमाने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येणार आहे. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती समितीचे निवड करण्यासाठी 

विरसेव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जयंती समितीचे अध्यक्ष पदी अजय गुरपप्पा शेटे,उपाध्यक्षपदी शिवकुमार शीलवंत आणि प्रसन्न भीमाशंकर राचट्टे सचिव पदी केदार मल्लिकार्जुन निगुडगे,यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे सहसचिव योगेश उटगे, कोषाध्यक्ष आकाश सचिन  उटगे, सह,कोशाध्यक्ष प्रणव राजशेखर नागराळे, सजावट प्रमुख संगमेश्वर अनिलअप्पा ईळेकर, सागर गवळी, रितेश मुर्गे, प्रशांत कल्याणी, प्रसिद्धीप्रमुख गणेश मुळे, जितेश कल्याणी, आणि मुक्तेश्वर मिटकरी, मिरवणूक प्रमुख पदी प्रवीण कारंजे, अक्षय कल्लूरे, गंगाधर कुरले, केशर रड्डे  शिवलिंग लद्दे प्रणव तोडकरी, महेश शेटे, अभिषेक कोरे, ओमकार बाडगिरे, योगेश स्वामी, प्रमोद ठेसे यांची निवड करण्यात आली असून महात्मा बसवेश्वर जयंती च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे वीरशैव समाज औसा यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या