प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल भरण्यासाठी मुदत 21 एप्रिल पर्यंत वाढवून दिली -उमर पंजेशा यांच्या मागणीला यश..

 प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल भरण्यासाठी मुदत 21 एप्रिल पर्यंत वाढवून दिली -उमर पंजेशा यांच्या मागणीला यश..


औसा प्रतिनिधी 

 प्रधान मंत्री आवास योजना घरकुल 2.0 भरण्यासाठी शेवट ची तारीख 31 मार्च 2025 होती , परंतू शहरातील नागरिकांचे कागद पत्र जुळवा जुळव करण्यात वेळ जात आहे काहींचे न. पा. रिव्हिजन 8 अ चे काम पूर्ण झाले नाही, उत्पन्न प्रमाणपत्र पाच पाच दिवस मिळत नाही त्यामुळे अनेक नागरिक घरकुल भरण्यापासून वंचीत राहणार आहेत,

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या महत्वकाक्षी योजने पासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी औसा नगर परिषद मुख्याधिकारी  साहेब यांना मुदत वाढवून मिळावी यासाठी निवेदन दिले .

 व घरकुल योजनेचा अर्ज करण्यासाठी 8 अ आवश्यक आहे परंतू नगर परिषद अधिकारी  8 अ  देण्यासाठी घरपट्टी बरोबर नळपट्टी भरण्याची अट घातली आहे, ती अट रद्द करावी यासाठी ही मुख्याधिकारी साहेब यांना औसा येथील सामाजिक कार्यकर्ता उमर पंजेशा यांनी औसा नगरपालिके चे मुख्याधिकारी यांना घरकुल योजनेचा अर्ज भरण्या साठी तारीख वाढवून द्या असे निवेदनाद्वारे मागणी केली होती त्यांच्या  या मागणीनूसार 21 एप्रिल 2025 ही तारीख वाढवून दिली आहे. त्यांच्या मागणीला आज यश आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या