कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत जागतिक महिला दीन साजरा
बी डी उबाळे
औसा: घरातील एक महिला सुशिक्षित झाली तर ते कुटुंब संपूर्ण स्वावलंबी आणि सुशिक्षित होते यामुळे महिलांनी शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक परिवर्तन घडवून आणणे ही आजच्या काळाची गरज आहे. ही गरज ओळखून अनेक सेवाभावी संस्था समाजातील वंचित,पीडित,आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांचे आर्थिक सबलीकरण करण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करीत असतात.
याकरिता औसा तालुक्यातील कमलाबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही त्याचप्रमाणे सार्वजनिक हित आणि लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात औसा तालुक्यामध्येअग्रेसर आहे..
यामुळेच जागतिक महिला दिनानिमित्त कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असून आणि सतत सामाजिक उपक्रम हाती घेत समाजा प्रती एक नवा आदर्श ठेवत आहे. तसेच दिनांक 8 मार्च 25 रोजी चलबुर्गा येथील सर्व अंगणवाडी कर्मचारी आणि कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विदयमाने जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मान करून हा दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमोद सुरवसे,वनिता शिंदे,श्रीमती अंजलीताई कांबळे, मिलिंद कांबळे,अनिल शिंदे,तसेच गावातील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस सह कौशल्याताई जाधव आणि गावातील महिला, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते .
0 टिप्पण्या